Showing posts with label Nature. Show all posts
Showing posts with label Nature. Show all posts

Monday, September 19, 2016

कास

धुक्यात ओघळते
रंगांचे ठिपके
जग-रहाटीला झुलत
वार्याला डोलत
उभे आपसूक आपल्या जोमात;

कुठे आभाळी निळाई,
अन् सोवळ्यागत तेरडा,
चंदेरी कुमुदिनी कलाकुसर पाण्यात;

काठाशी कंदीली खरचुडी
कोंडी किटक परागीकरणात
रम्य,गूढात दाटले समृद्ध सजीव;

इथे गाळली सीतेनं आसवं भरमार
व्हावी फुलं ही जगभर,
पण,
मिळूदे विश्रांती,
परागांदा सीतेच्या लेकींच्या
आसवांना जन्मभर;

दवबिंदूंचा अलगद डोलारा कोमल
अल्लड इटूकला ठिपक्यांचा बहर
प्रकाशकणांना जलबिंदूची झालर;

सार्या आसमंतात स्वप्न इवले
उभे स्वच्छंद, शांत खंबीर
जरी दाटला आनंद महामूर.


Please note, आभाळी, तेरडा, कुमुदिनी, कंदील पुष्प (कंदील खरचुडी- परागीकरणासाठी किटकाला फुलात कोंडून ठेवणारं एक संदर दुर्मिळ फुलझाड), सीतेची आसवं, दवबिंदू ही खास कास पठारावर मिळणार्या फुलांची नावं आहेत. इथे तेरड्याची सोवळ्याच्या कदासारखा जांभळाभोर रंगाची फुलं दिसली.  

- स्वाती September 19, 2016 23.03 pm.
( Sept 16 - 18 2016)

Monday, September 3, 2012

मायासर्द पावसाळी हवेला
गार वाऱ्याचे उमाळे

ओल्या धुक्याची झालर
 
कडेलोटात ओघळे

गच्च रानात गुपित

रुण - झूण उलगडे

संगे सोबती शेवाळी
शांत पहाडाचे कडे

चिंब ओथंबले प्राण
श्वास - श्वास उलगडे

मेघ मल्हाराची माया

आले संगीत चहूकडे.


- स्वाती 3 Sept, 2012.
 #MarathiKavita
 

Sunday, September 25, 2011

मोह : -)

मोह

हिरव्या उघड्या देहावरी
इन्द्रधनुची तिरीप |

रंग -
ढंगांची फुलोरी
तुझी राकट झडप ||


वारा आवरेना वावरी
काय छंदी - फंदी रीत |

हिरव्या देहात उभार
हाय, संयमाशी फारकत ||


जाग अलगद आली
संथ मिठी सैलावत |
हिरव्या देहांवर दवली
घर्मबिंदू कलाबूत ||


- स्वाती, September 24, 2011.

Sunday, August 28, 2011

स्तब्ध - २

स्तब्ध - २


चिंब भिजली फुले,
गवतावरचे मोती
शब्दांची वाफ झुले
अवती - भवती.


           - स्वाती August 28, 2011.

Saturday, June 11, 2011

स्तब्ध

स्तब्ध १

पहिल्या पावसापूर्वी ! . . . . .


पाऊस येऊ येऊ सा
सवयीचं पुस्तक अन
राखाडी आकाश साथीला. 

        - स्वाती जून २ २०११.

Tuesday, April 12, 2011

वसंतातल्या छोटुकल्या कविता
वसंतातल्या छोटुकल्या कविता

1.
हिरव्या पानांचा, पिवळ्या फुलांचा, तांबड्या तुर्यांचा,
आला वसंत
उमलत, उलगत, फुलवत - - -
आणि संगे सयींचे आवर्त.

2.

मेंदी ल्याले केस
त्यांना निलगिरीचा सुगावा
रणरणत्या डोक्यातून
दिलखुश गारवा.
 


- स्वाती April 3, 2011
Sunday, October 10, 2010

Daffodils क्षण

Daffodils  क्षण 

ढगांच्या दुलई बरोबर
लाल मातीत आणि

ओल्या कंच गवतावर
अलगद फिरताना
दिसलात मला

छोट्या छोट्या पिवळ्या रांगोळ्याच जणू ,
की Wordsworth च्या Daffodils
माळशेज घाटाच्या भेटीला आल्या म्हणू !

- स्वाती, October 5, 2010.

माळशेज घाटात एका पावसाळी दुपारी आलेल्या अनुभवावर आधारीत.

Monday, June 14, 2010

Majestic Mansoon

Gusty Wind,
Lightening & Thunder
Rain Waves ... Spin the Mist
Majestic Monsoon bestows the Feast!

- Swati, June 14, 2010.

Monday, March 15, 2010

बहावा - वहावा !

बहावा  - वहावा !

  • बहावा

ऐन वसंतातली पानगळ - - - 
 - - -  पानगळ !
छे , ही तर चाहूल 
अनोख्या फुलघोसांच्या बहराची .
  • बहावा
आकाशातून जमिनीवर 
लाडात उतरणारे
घवघवीत  फुलघोस
वेगळपणाची श्रीमंती 
डौल, अपूर्वच!

  • बहावा

वसंतातली पानगळ
बहराचे आगळपण 
बंडखोरीचे साक्षात रूप 

उन्हाळलेल्या वसंताला  आला हुरूप
बहावा - वहावा !  बहावा - वहावा !
अहाहा ! अहाहा ! !

- स्वाती March 15, 2010.
Within next few days,  बहावा, i.e., Casia Fistula will be in full blossom in Mumbai. This tree has been an object of writing interest for Mr. V. D. Ghate, Ms. Durga Bhagwat and Dr. Sharadini Dahanukar, who have written about this beautiful tree in Marathi. Here is my petty attempt.

Monday, March 8, 2010

Flamingos!

Flamingo 1

Brown, White, Pink and Black
Dots perform Symphony.
Flamingo flight is ...
An Unfamilier Amusing Company!

Flamingo 2

Waves of brown, white, pink and black ----
What a pretty sight
Flamingos' Flight !

March 07 2010

Monday, February 8, 2010

शांतता

शांतता


प्रदुषणाला न जुमानता
सुर्यप्रकाशाने क्षितिज विस्तारले
सर्वत्र गुलाबी, सोनरंगी ऊन   - - - -

उंच इमारतीमधल्या माझ्या कोपय्रातुन
मला दिसले  - - -  क्षितिजाच्या दोन टोकांवर
माहुल चा डोंगर आणि
हाजी मलंगाचे सुळके
- - -  काही क्षण

काही क्षणच
मुंबईतले सारे अंतहीन आवाज
विरघळून गेले  - - - -
या दोन डोंगरांच्या दरम्यान
 - - - - -  माझ्या नजरेत.

- स्वाती

Saturday, February 6, 2010

Marathi Haiku

क्रौर्य

परवानगी नाकारली तुला
तुझ्या अस्तित्वाची

साथ

मिणमिणता उजेड
एकटीची वाट
अचानक तुझी
आश्वासक साथ
- स्वाती

Haikus

Cruelty

Consent given
to deny thee -----
thy existance
- Swati


Company


Long Dark Road'
A lonely Walk
From around the corner, you join!

- SwatiThese two were made as a part of the creative writing workshop, Byculla June 2009. Company is about the happiest moment of my life. Cruelty is about the the sadest event, my own decision ...

Sunday, December 13, 2009

फ्लेमिंगो

फ्लेमिंगो

किरमिजी, पांढर्या, गुलाबी, काळ्या - - - -
रंगांचा देखणा तरंग;
फ्लामिन्गोंच्या भरारीचा, अपरिचित संग .

                        - स्वाती
शनिवार १२ - १२- २००९ च्या संध्याकाळी शिवडी च्या समुद्र किनारी रोहित पक्षी बघण्यासाठी अविमामा ची सहल.