लांडगेगटांगळ्या खात पळून जाता जाता
यांनी तोडलेयत लचके,
थोडे माणसांचे,
मग माणसांनी केलेल्या कमाईचे,
अन् खूप जास्त या व्यवस्थेचे. 


मुर्दाड लबाडीने 
आपली वखवख पुरवत,
हे उंडारतायत खुशाल
इथं मागं उरलीयेत,
लचक्यांची कुजकट शितं.

- Swati Vaidya February 23, 2018.
Poem and Photos ©Ms. Swati Vaidya

Comments

खुपच छान स्वाती खुप दिवसानी मनाच्या गाभ्याला अलगद स्पर्श करणार्‍या,नाविन्यपूर्ण शैली असलेल्या कविता आणी हायकु वाचल्या.
कवियत्री म्हणून तुझ्या वाटचालीस शुभेच्छा.
प्रा.किशोर गुप्ते.
Swati Vaidya said…
Thank you Prof.Gupte.