प्रश्नटाळू
काय उपयोग मोठ्या छातीचा ? 
नुसतीच जर मिरवायचीत मापं तर? ;

तसा तर केलाच आहे सामना, 
अनेकांनी - जिवंत, ज्वलंत प्रश्नांचा,
थेट हृदय शस्त्रक्रीयेनंतर पण; 

आहे नं जर दमदार हृदय? 
तर मग करत का नाही, 
'एक तास प्रश्नोत्तरांचा?,

ज्यात नाहीयेत ठरवलेल्या निर्णयांच्या आघोषणा, वा 
थेट प्रक्षेपीत भाषणबाजीची नाटकं !!


-स्वाती मे 18 2017 16.49

Comments