उगवती
क्षितीजाला फोडून आला 
सूर्य उघड्या जगती,
उगवतीचे रंग मिसळले
अंतरीच्या आकाशयात्री ;

काय जे होऊन गेले 
अन् काय पाठी राहिले ,
चिरनूतन जगण्याचे 
सोहोळे पुढे ठाकले !

दृश्य, स्पर्श अन् ऐकलेल्या 
वेदनांची याद आहे ,
क्षितीजाच्या उगवतीची 
आशाभरी साद आहे .

- Swati January 29, 2017 7.38 am @ Jaipur

Comments