Friday, January 20, 2017

नकळत

चालताना भान असते
सोडलेल्या लाटांपाशी ;

थांबताना आवेग आवरे
हुकवलेल्या कड्यांपाशी ;

कधीतरी ओढ लागते 
सोनपिवळ्या चाहूलीची ;

हर नव्याचा आनंद आहे 
न कशाचे अप्रूपही ;

जवळ आहे जे दूर गेले 
अन् जवळ वाटे दूर जे अजूनही ;

थांबण्याची सक्ती नाही
अन् धावण्याची गरजही ;

काय अन् कसे हे करत जाते 
या वयाचे व्यक्तित्वही .

- स्वाती January 19, 2017 6.45 am

7 comments:

Anonymous said...

आयुष्याचा आनंद उपभोगत असतांनाच त्याकडे तटस्थ पणे पाहण्याचा कवीचा दृष्टीकोण या कवितेत दिसतो. माझे मत.
उत्तम जोगदंड

Ravneet said...

Beautiful

Swati Vaidya said...

धनूयवाद सर

Swati Vaidya said...

Ravneet my dearThanks.

Fine Artist Suman Dabholkar said...

खूपच सुंदर.

Fine Artist Suman Dabholkar said...

खूपच सुंदर.

Swati Vaidya said...

Thak you Suman Dabholkar.