संभ्रम

पावसातला सह्याद्री आठवत
खुशालते चेरापूंजीतल्या धुक्यात
अन् खंडाळा घाटातल्या धुक्यात
सुखावते मेघालयाच्या आभासात

कुठं म्हणायचं, कशाला आपलं ?
कोण असतं, कशाला, कोणाचं ?

चार ठाव जगताना
सार्या आकाशाला कवळत
कशाला वागवायचं ओझं वेड्यागत ?

खूणावतं काही दूरून,
की आभासातच ते पण ?

जोडत जायचं काही-बाही
कशाला, उगाच विनाकारण ?

धुक्यातले गुपीत, 
क्षणोक्षण टिपत आठवणींचा खेळ, 
वा पांघरून कधी स्वप्नांची झालर
बसून गप्पगार, विचारात स्वगत
काही करून होईना, 
जे गेले व्हायचे राहून
काय गरज ज्याची, 
जर जगले त्यावाचून.


- स्वाती 14 ऑगस्ट 2016 8.41 am

Comments