जगता - जगता ....

काय काय गोळा करत असतो ?
कधी इकडे तिकडे विखूरलेल्या
हव्याशा क्षणांची शिदोरी ;


तर कधी गुंडाळून, वाट बदलून
मागे ढकललेले असेच काय काय. ..पण करतोचना, गोळा - बेरीज?
वेचता, वेचता,

सारे जे जगून चुकले
अन् जगण्यावाचून राहिले


सारा प्रवास हा असा
खरंतर या गणितादरम्यान !

क्वचितच कधी
सारं हवं तसं मांडून
राखत ताठ मान-   स्वाती   September 03 2015       23.42

Comments