Saturday, March 7, 2015

तळ्यात - मळ्यात

ऐन माध्यानीत / मध्यरात्रीत 
भरून आलीये आस 
सूर्योदय / चंद्रोदयाची 

तळ्यातले बिंब जरी 
शिशिराची साक्ष देई 
वाटेतली रानतुळस 
देई चैत्राची उभारी

अंधारल्या वाटेवरी 
पायरवांची सोबत 
कुठेतरी दगडामागे 
कोण चाहूल घेई 

रणरणत्या उन्हात  
चटक्यांना सोसत 
खिळून रहावं मळ्यात 
की  घ्यावी उडी तळ्यात ?

अशा संभ्रमांत हेलकावत 
चालत, धावत, गुंगत 
खिन्न नजर क्षणांत 
जरी रोमांच मनात  

आज काठावरी येत 
केले धाडस जोशात 
जरी पाय रोऊन उभे 
ना तळ्यात ना मळ्यात 

- स्वाती 07 March 2015
#MarathiKavita