कौतुक

कसं सांगू तुला ?
काय होतं मला,
तुझ्या एका विचारानेही 
असं भरभरून येणं मनाचं 

निवांत असूनही खळाळतं झऱ्यागत 
सावध, तरीही उत्साहात ओथंबलेलं
तुझ्या एका लकबिच्या सईवर डोलणारं

कुठेही असलं तरी 
कशाचीही पर्वा न करत  
आनंदाची बरसात वाटणारं  

एक गुपित फक्त माझं
तुझ्यासाठी निर्मळतेचं. 

- स्वाती October 02, 2014
#MarathiKavita
#NatureTrail

Comments