Posts

Showing posts from August, 2014

स्थिर - खंबीर

हिंदोळे विचारांचे
अन् तरंग मनाचे

थोडे गढूळले
काही निवळले

या तीरासून - त्या तीरागत
येते - जाते भिरभीरल्यागत

या नावाडीणीला भय तीराचे
वल्हवणेच जणू श्रेय तिचे

हिंदकळ्यांची नुसती वडवड
हाती आली नुसतीच परवड

भोवरे अन् हिंदोळे,
पचवून सारे घोटाळे

जरी नावेची झाली पडझड
तरी नावाडीण आता वरचढ

हिन्दोळ्यांची शिदोरी बांधून डोक्यात
ताठ मानेने उभी या जगात

भर पाण्यामध्ये आता नाव वहावत नाही
अन् वल्हवण्याची आता गरजही नाही

स्थिर रहाते डौलात,
जरी डोलते वाहत्या पाण्यात
धैर्य अन् स्थैर्य अलगद जोमात,
नावाडीणीच्या अखंड सोबतीत.

- Swati.  August 27, 2014 13.40
#MarathiKavita

विचार कूट

बनून जायचंय  एक अशी व्यक्ती  जिला ना विरक्ती, ना आसक्तीही  ना खंत, ना खेद, ना दु:खही
मात्र जिला आहे  अपार आनंद  दररोज, क्षणोक्षणी  जिवंत असण्यातला 
काही नाही,  आठवणी उगाळायची  सवय सोडून दिली नं तर  सहज शक्य आहे  अश्शी व्यक्ती होणं 
पण मग …….  आठवणीच नाही काढल्या तर ? काय असतो आनंद अन् काय असते चिंता  यातला फरक कसा आठवणार नं?
तर मग काय? तुमच्या - आमच्या आठवणींची खोड  जात्या जाणार नाय !
- स्वाती August 17, 2014 2.00 pm
#MarathiKavita

Shake Effects n Over Exposures, Playing with the camera!

Image
Sometimes all it takes is a nice outing to practice your favourite technique you think you forgot! @Chokhi Dhani, Near Kalyan, Maharashtra, India  


Sometimes Overexposures give you a different piicture than reality!   The correcct exposure shows this,

And the slightly overexposed gave this picture:


- Swati,  August 17, 2014

पुरे झालं

पुरे झालं वाट बघणं
पुरे झालं विरह सोसणं,
पुरे झालं चालवून घेणं
हे असलं सारं,
प्रेमापायी आणि प्रेम म्हणून.

जर अस्संच असणार असेल
यापुढेही, तर मग पुरेच झालं,
जे काय मिळालं ते
प्रेमाच्या नावाखाली.

पुरे झालं, काय येईल ते साजरं करणं,
आणि वाट्टेल तसं निरपेक्ष प्रेम करंत रहाणं,
पुरे झालं बेईमानी अन् बदफैली पेलवणं
प्रेमाचं घोडं गंगेत  वाहूनही कोरडंच उरलं

पुरे झालं प्रेमासाठी आशाळभूत खंगणं
पृथ्वीच्या प्रेमगीतागत
असंभव मिलनाच्या आळवणीला गोंजारणं

अस्सच असणारे प्रेम तर मग ते पुरेच झालं,
आजवर जसं दुसर्यावर केलं जीवापाड
ते आता फक्त आपल्यावर करत रहाणं
याहून काही उपाय शोधत रहाणं,
पुरे झालं.

(प्रिय कुसुमाग्रज, तुमच्या कवितांनी प्रेमाचा एक अर्थ शिकवला अन् तसे करण्याला आशावादही. पण माफ करा, आज त्या प्रेम करण्याच्या सवयीची अन् आशावादाचीही कास सोडून नुसतीच जगायचं म्हणतेय)

- स्वाती, August 8, 23.13
#MarathiKavita  #Kusumagraj