Tuesday, July 22, 2014

Just Photos Agaiin!

Some Photos Ranthambhore National Park, Rajasthan, India  May 23 -27, 2014


Close to Entry Point of the Ranthambhore National Park
Saturday, July 5, 2014

राशोमान

(राशोमान = जपानी दिग्दर्शक अकीरा कुरोसावा यांचा सुंदर चित्रपट. राशोमान म्हणजे दुमत, मतांतर, एकाच घटनेकडे  बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन)

राशोमानने आपल्यातल्या
फक्त अंतरं वाढली

अंतरं गढूळली

एकदा बसून आमोर - सामोर
करू या की संवाद भांडणखोर


काय होतं जे निसटलं?
काय निसटूनही नाही आटपलं?
बोलूया की सरळसोट, विना घोर


एकाच घटनेचे सापेक्ष अर्थ
व्यक्ती निसटल्या की सारेच व्यर्थ
राशोमान असंवादात समर्थ


संवाद, विवाद, निर्भिड लवाद
करूया की माफ सारे पुराणे प्रमाद


गंभीर राहून, अंतर राखून,
स्थिरता पावून, असावी काय म्हणून; 

स्मशान-शांतता मरण्यावाचून?

पाहूया करून आरोप - प्रत्यारोप
का त्यामध्ये दडला राशोमानाचा समारोप?


असले प्रश्न अन् कसली उत्तरे
आपला दुरावा राशोमानाचीच फळे;
राशोमानी दुरावा हवा की नको?

का दुरावा असूनही हवेय राशोमान?

तुझ्या अन माझ्यात 
अळी -मिळी गुप - चिळी  
का स्वातंत्र्य - दुराव्याची जोडगोळी?

आहे ही कोंडी  
फोडावी? 
की सोडावी?
मध्यॆ न येण्याची 
राशोमाना कृपा व्हावी   


- Swati, July 5, 2014 4.00 pm
#MarathiKavita