Posts

Showing posts from 2014

Change

Image
Some circumstances changed Me
And I changed some of them.

Oh, the Resilience and Desire to Survive,
You made me this Upright Me!

But Resilience and Desire to Happiness is yet far from sight.


- Swati.

Dec 08 2014    6.30 am

पल

Image
बीते कल की यादे
जब सिसकीयां लेके आती
तब उन लम्हो का झेला
बीते कल की गवाही है होती

बीते पलोंकी यादे
जब बुदबुदी हसींसी आती
तब वैसे पलोंको होना
आते मौसमकी आहटसी भाती

हर मकाम पर,
सब पल लेकर आते है
अपने परों पर
कब कोई मासला, कभी हल

बस जी लेना है मनभर
हर मकामसे लूटते हुए
वह सारे पल
जो लुटाती है जिंदगी हमपर


- Swati.   Dec 04, 2014     2.30 pm

शांतीचे उधाण

Image
आली हळूवार
अन् जोशात
एक जाणीव सुंदर

जसे दडले अत्तर
दरवळे उघडत्या कुपीत


उत्सव असण्याचा
हर क्षणांत जगण्याचा
अन् सोहळा सदाचा
सण साजरा अनुभवांचा

लाख मोलाची समज
आपसूक जवळीक

संथ सरोवरात राहून
मोकळ्या वार्याला घरपण

इथे लाटही नाही
ना ओहोटीची भिती
ना गाठायचे शिखर
मोकळ्या पठारावरती

जगी काही - बाही
कि डूक - मिडूक
इथे गमे सारे आपसूक
पुरे दृष्टीक्षेप एक

जोमदार चाल
विश्वासात पाऊल
अनोख्या पठाराशी
पावलांचे हितगूज

आले शांतीचे उधाण
जसा लाव्हा गर्भागारात
ना खंड अपार सखोल
ना खंड अपार सखोल.


- स्वाती,  Oct. 23, 2014 21.00
#MarathiKavita

Eternal Want not Need!

Image
Had a hope of recieving love
Of loving the person for life
Of committing to be there in thick & thin
And then it all went wrong!


In a sudden corner then,
We crossed path again
Facing each other comfortably
We were fend to ourselves to decide;

If to crossover and connect
Or if to override and stay apart.

Its not easy either ways
Its easy to love and to want being loved

Its difficult to love and trust again
Wrestling of ego, habits & shadows of past

Its not easy to come to terms;
To want love though not in Need of it.


(These thoughts became stronger after watching the film - Finding Fanny)
- Swati. October 03 2014

Deception

Hiding intentionally
Being clear to blurr the reality
Distorting with purpose;

Orchastrated chaos, managed to precision
A plan of action to decieve
A decision to digress;

As you want to fool others.
Can you fool everyone, Everytime?


- Swati. October 03, 2014

कौतुक

Image
कसं सांगू तुला ?
काय होतं मला,
तुझ्या एका विचारानेही  असं भरभरून येणं मनाचं
निवांत असूनही खळाळतं झऱ्यागत  सावध, तरीही उत्साहात ओथंबलेलं तुझ्या एका लकबिच्या सईवर डोलणारं
कुठेही असलं तरी  कशाचीही पर्वा न करत   आनंदाची बरसात वाटणारं  
एक गुपित फक्त माझं तुझ्यासाठी निर्मळतेचं. 
- स्वाती October 02, 2014
#MarathiKavita
#NatureTrail

Longing!

Image
Its about a desire  And about hope  Also an unfulfilled wish

Its not just a hope
Nor a rational expectation 
and no way a probable outcome

It is a thought 
of a possible future 
a desirable future

Let there be not so long 
for the longing to be over
Let their be desire 
May there be joy in fulfillment !!!


- Swati October 02, 2014

ऐ जिंदगी !!

Image
एक कहना है
तुझसे ऐ जिंदगी;


बस देती जा भरभरके
सारा कुछ अबसे,
जो नहीं मिला
अब तक तुझसे, 


तेरे रॅन्डम नियमों से ही
लगता है विश्वास से
की वह छुपे सारे अनुभव
जुड़ जाने चाहिए अब
मेरे रॅन्डम आशावादसे,

जरासी आहट से डरते हुए
अब मेरे अंदर जगी है चाह

किसी आहट ओर छांव के बरसनेकी,

ऐसी चाह जिसकी कोई नहीं सीमा
न हो जिसकी कोई सिसकीयां;


बस देती  जा भरपूर
वह सारे ख्वाब, जिन्हे देखना भी 

बन गया था बंदी 
नींद के कैदखानेका . 

- स्वाती    September 28, 2014 

9 / 11 का कत्ल

9 /11, सितंबर ग्यारह,
इतिहास के पन्नोंकी एक तारीख
जिस दिन गिराये थे दो तामीर
और कत्ल हुआ था कईं लोगोंकी रोटीयोंका.

यहीं तारीख मुक्र हुई थी
पिछले साल,
की जो रिश्ता बुन रहीं थी मैं कईं साल,
उसका कत्ल होना था इसी दिन, बाकायदा.

आज ठीक 365 दिन
और उतनीही रातोंके बाद
लग रहा है
शायद उस रिश्तेका कत्ल खत्म हुआ है
और शोक मनाना भी

इस तारीख पर निशान है कईं,
कुछ खूनोंके और कईं मरे सपनोंके
इतिहास के इन लम्होंको
अलविदा और सलाम.

- स्वाती Sept. 11, 2014 19.00

स्थिर - खंबीर

हिंदोळे विचारांचे
अन् तरंग मनाचे

थोडे गढूळले
काही निवळले

या तीरासून - त्या तीरागत
येते - जाते भिरभीरल्यागत

या नावाडीणीला भय तीराचे
वल्हवणेच जणू श्रेय तिचे

हिंदकळ्यांची नुसती वडवड
हाती आली नुसतीच परवड

भोवरे अन् हिंदोळे,
पचवून सारे घोटाळे

जरी नावेची झाली पडझड
तरी नावाडीण आता वरचढ

हिन्दोळ्यांची शिदोरी बांधून डोक्यात
ताठ मानेने उभी या जगात

भर पाण्यामध्ये आता नाव वहावत नाही
अन् वल्हवण्याची आता गरजही नाही

स्थिर रहाते डौलात,
जरी डोलते वाहत्या पाण्यात
धैर्य अन् स्थैर्य अलगद जोमात,
नावाडीणीच्या अखंड सोबतीत.

- Swati.  August 27, 2014 13.40
#MarathiKavita

विचार कूट

बनून जायचंय  एक अशी व्यक्ती  जिला ना विरक्ती, ना आसक्तीही  ना खंत, ना खेद, ना दु:खही
मात्र जिला आहे  अपार आनंद  दररोज, क्षणोक्षणी  जिवंत असण्यातला 
काही नाही,  आठवणी उगाळायची  सवय सोडून दिली नं तर  सहज शक्य आहे  अश्शी व्यक्ती होणं 
पण मग …….  आठवणीच नाही काढल्या तर ? काय असतो आनंद अन् काय असते चिंता  यातला फरक कसा आठवणार नं?
तर मग काय? तुमच्या - आमच्या आठवणींची खोड  जात्या जाणार नाय !
- स्वाती August 17, 2014 2.00 pm
#MarathiKavita

Shake Effects n Over Exposures, Playing with the camera!

Image
Sometimes all it takes is a nice outing to practice your favourite technique you think you forgot! @Chokhi Dhani, Near Kalyan, Maharashtra, India  






















Sometimes Overexposures give you a different piicture than reality!   The correcct exposure shows this,

And the slightly overexposed gave this picture:


- Swati,  August 17, 2014

पुरे झालं

पुरे झालं वाट बघणं
पुरे झालं विरह सोसणं,
पुरे झालं चालवून घेणं
हे असलं सारं,
प्रेमापायी आणि प्रेम म्हणून.

जर अस्संच असणार असेल
यापुढेही, तर मग पुरेच झालं,
जे काय मिळालं ते
प्रेमाच्या नावाखाली.

पुरे झालं, काय येईल ते साजरं करणं,
आणि वाट्टेल तसं निरपेक्ष प्रेम करंत रहाणं,
पुरे झालं बेईमानी अन् बदफैली पेलवणं
प्रेमाचं घोडं गंगेत  वाहूनही कोरडंच उरलं

पुरे झालं प्रेमासाठी आशाळभूत खंगणं
पृथ्वीच्या प्रेमगीतागत
असंभव मिलनाच्या आळवणीला गोंजारणं

अस्सच असणारे प्रेम तर मग ते पुरेच झालं,
आजवर जसं दुसर्यावर केलं जीवापाड
ते आता फक्त आपल्यावर करत रहाणं
याहून काही उपाय शोधत रहाणं,
पुरे झालं.

(प्रिय कुसुमाग्रज, तुमच्या कवितांनी प्रेमाचा एक अर्थ शिकवला अन् तसे करण्याला आशावादही. पण माफ करा, आज त्या प्रेम करण्याच्या सवयीची अन् आशावादाचीही कास सोडून नुसतीच जगायचं म्हणतेय)

- स्वाती, August 8, 23.13
#MarathiKavita  #Kusumagraj

Just Photos Agaiin!

Image
Some Photos Ranthambhore National Park, Rajasthan, India  May 23 -27, 2014
























































राशोमान

Image
(राशोमान = जपानी दिग्दर्शक अकीरा कुरोसावा यांचा सुंदर चित्रपट. राशोमान म्हणजे दुमत, मतांतर, एकाच घटनेकडे  बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन)

राशोमानने आपल्यातल्या
फक्त अंतरं वाढली

अंतरं गढूळली

एकदा बसून आमोर - सामोर
करू या की संवाद भांडणखोर


काय होतं जे निसटलं?
काय निसटूनही नाही आटपलं?
बोलूया की सरळसोट, विना घोर

एकाच घटनेचे सापेक्ष अर्थ
व्यक्ती निसटल्या की सारेच व्यर्थ
राशोमान असंवादात समर्थ

संवाद, विवाद, निर्भिड लवाद
करूया की माफ सारे पुराणे प्रमाद

गंभीर राहून, अंतर राखून,
स्थिरता पावून, असावी काय म्हणून; 
स्मशान-शांतता मरण्यावाचून?

पाहूया करून आरोप - प्रत्यारोप
का त्यामध्ये दडला राशोमानाचा समारोप?

असले प्रश्न अन् कसली उत्तरे
आपला दुरावा राशोमानाचीच फळे;
राशोमानी दुरावा हवा की नको?
का दुरावा असूनही हवेय राशोमान?

तुझ्या अन माझ्यात 
अळी -मिळी गुप - चिळी  
का स्वातंत्र्य - दुराव्याची जोडगोळी?

आहे ही कोंडी 
फोडावी? 
की सोडावी?
मध्यॆ न येण्याची 
राशोमाना कृपा व्हावी   


- Swati, July 5, 2014 4.00 pm
#MarathiKavita

बंध

आपण एकत्र असू - असू चे नसते झाल्यानंतर खूप वर्षांनी भेटलो तेव्हा, समोर फक्त तुझ्या माझ्यातले बदल होते साक्षीला;
भेटून चक्क बोललो की खंडीभर तितकी लांबू दिलीच की, - अचानकशी भेट 
वाढल्या वयाची साक्ष देते तुझे - माझे रुपेरी केस, अन् आपला समजूतदारपणा !
पण सगळ्या वरताण होऊन उरलाच एक सहजभाव तुझ्या  - माझ्यातला ; 
अश्शा अनपेक्षीत भेटीला तू घालून आलेलास एक मोतिया रंगाचा झब्बा जो होता तुझ्या जगभरातल्या भटकंतींपैकी एकचं सुविनेर
तो झब्बा बघून एकदम खूष झाले अन् निघता निघता न राहवून सांगूनच गेले, 'अरे मलापण खूप आवडतो माझा या रंगाचा स्वेटशर्ट अन् त्याला पण आहे अश्शीच  बंद गळ्याभोवती नागमोडी नक्षी'. 
आतासुद्धा मजेत असूनही स्थिर राहीलास तू, आणि मी ही;
पण झब्ब्याची नागमोडी महीरप हवेमध्ये गिरवून ही गंमत मी सांगताना मात्र, तू घेता घेता अर्ध्यावर सोडलास एक अख्खा श्वास;
तो काय आपल्यातल्या तटबंद्या आणि ओढीला अधोरेखित करायला का रे ?

- स्वाती   Dec. 14, 2013.
#MarathiKavita 

तोडफोड

जॉब चं बरं असतं
एक सोडून लगेच
दुसरा घेतो सहजच.

नात्यांचं पण असंच काय?

काही लोकांसाठी तरी
उत्तर होयच!,
नक्की,

बाकीच्यांची मात्र
दमछाक नुसती
नातं जोडताना आणि
नातं तुटल्यावरही.

- स्वाती June 1, 2014 20.20 pm
#MarathiKavita

बसेरा

सालों बाद, लौट आयी हूँ इस मुक़ाम पर

वापस आने पर समझा 
यह घर हैं मेरा

जहाँ पर लौटूँगी मैं 
हमेशा, हर मुक़ाम से  -  वापस.

                   - स्वाती, May 30, 2014 12.20 noon

'द ग्रेट राँयल - बंगाल टायगर'

निर्भीड, निवांत, - तू जबरदस्त!
पिवळ्या अंगरख्याला पट्टेरी नक्षी बेशिस्त

तुझ्या एका झलकीसाठी रानभरात शिकस्त
असा महाराजसी रुबाब
कसा स्वतःतच मनमस्त!

तुझ्या एका नजरेत शिकार
माझ्या गात्रांतला मर्कट त्रस्त


असे आत्ममग्न तुझे ध्यान
अरे, आले मला माझे भान

आत्मक्षमतेचा विश्वास
बाळगून सतत 
अखंड संचार, बेदरकार खास !


तुझी चाहूल रानांत
रान सारं कातरं, कातरं
तुझ्याविना रान कसं मोकळं मोकळं 

         - स्वाती   May 25, 2014 @ Ranthambhore Rajasthan 5 pm
#MarathiKavita

भान

कानांत गोंगाट
गोंधळ मनात
शहरी गर्दीत
स्पर्धेत हरपत
कसल्या शोधात?

शोधाची घाई
अंगाची लाही लाही
कामावर लगीनघाई
पोकळ संबंधांची नवलाई
सारे काही कशापायी?

हरपल्या भानाने
झुंडीचे चालणे
झुंडीत आपण वहावणे ...?
की झुंडीपासून अंतर राखणे  ?
सरळ आहे उत्तर नाहीत बहाणे.

आपली शांतता, सुख अन् समाधान
आपल्या निवडीशी त्यांचे ईमान
आपण आपले राखून भान
असे मिळेल आनंद निधान...?

- स्वाती April 28, 2014. 18.51
#MarathiKavita

Photos of Casia Fistula & Nagchafa flowers

Image

मोगरा फुलला

Image

दरम्यान

सन्नाटे के शोर के बीच
खडे है फासले देखते ।

बीच में है लंबीसी दिवारे,
और कुछ शिकवे
जो कभी न सुने ना सुनाए ।

फिर भी कुछ था,
या है भी शायद
शोर मिटानेवाला
सन्नाटारहीत दरम्यान ।

स्वाती, 16 - 04 -2014, 9.15am

थंड़ स्वप्नं

या रस्त्यावर थांबलीशी आहेत काही स्वप्नं बंद ड़ोळ्याआड़ गपगार झालेली जणू कोणी स्वप्नांना दम भरला,
'अज्जिबात जागे होऊ नका', याद राखून असा - स्वप्नं झोपेतच असतात स्वप्नं बघणारे जागे होतात स्वप्न विसरत
लक्षात असूद्या स्वप्न जागी होत नाहीत.
- स्वाती April 16, 2014 14.16
#MarathiKavita

On Guard

Walls of Attitude
Build the Mountain of Solitude
On this Planet no one can Intrude.

Gated existance and Chained Feelings
Not a hint of water nor any warmth,
Hidden under burried longings.

A safety alert, for what?
For Guarding the comfort zone?

A zone to which one ought to guard before  entering
A zone from where leaving is un-comforting.
A guard for safety or comfort is the choice for making.

- Swati, April 03, 2014 22.20 pm

Nagchafa Flower(Canon Ball Tree Blassom), sndt womens university, juhu campus, Mumbai

Image
Phot taken on Feb 06,2014

मागणे

Image
मागे राहिलेल्या गावापाशी  एक छोटेसे मागणे आहे, अरे, तुझ्या आठवणीने  येणारे रडू सुकून जाऊ दे!

अरे, पुन्हा तुला बघताच  येऊ दे आनंदाचे तुषार, 'अहाहा! हे आहे …  मागे सुटलेले  - माझे एक गाव . 





- स्वाती Dec. 2013 - Jan. 2014
#MarathiKavita