श्वास

श्वास

ना खंत, ना खेदही
ना इच्छा ना विश्वास
तुटलेल्या नात्यासाठी
सॊडला शेवटचा श्वास !

तुझ्या-माझ्यात आहे
होईल वाटलेसे बरेच काही -
जे झालेच नाही,
त्या अधुर्या नात्यासाठी
सॊडले आहेत काही श्वास !


तुझ्या कुशीत वाढले
विसावले, उमलले
तुझ्या डोळ्यातील आसवांनी
माझे श्वास हपापले !

तुमच्या नि:शब्द कृतीने
जपले खूप काही
श्वास तुमचा जड झाला
त्यात अडकले माझे खूप काही !

तू जन्मताच झाली
तुझी- माझी जोडगोळी
तुझ्या - माझ्यामध्ये खूप काही
अळी-मिळी गुप चिळी
दुभंगले तुझे मन
माझा श्वास  - श्वास जाळी  !

तुझ्या - माझ्यातले मैत्र
काही अंतर जाणॆना
कातरला तुझा आवाज

श्वास मला  फुटेना  !

एक नि:शब्दाचे जिणे
त्याला कुठे रिते करू?
रितेपणाची कमाल
श्वास घेऊनही विझेना
घेउन झालेत सारे विझते श्वास !

तुमच्या अस्तित्वाने मिळाली
विवेकाची झालरं
तोडलेल्या तुमच्या श्वासासाठी
एक सक्रीय हुंकार !

शब्द शब्द बोलून झालंय
अब्द अब्द रडून झालंय
मोकळ्या श्वासाने चार ठाव जगायचंय
त्या सार्या जगण्यासाठी आशाभारले श्वास !

गार झुळूकीत
फुलांना वेचत
सुगंधी भेट अवचित
अलगद श्वासांच्या कवेत. 


- स्वाती Nov. 25, 2013
#MarathiKavita
 

Comments