Posts

Showing posts from August, 2011

स्तब्ध - २

स्तब्ध - २


चिंब भिजली फुले, गवतावरचे मोती शब्दांची वाफ झुले अवती - भवती.

           - स्वाती August 28, 2011.

स्वातंत्र्याची उत्तररात्र ....

स्वातंत्र्याची उत्तररात्र ....
चिंब भिजून आले स्वातंत्र्य मध्यरात्री; फाळणीचे घाव बसले डाव्या - उजव्या गात्री.
जोश, अन् आनंद अन् खंतही हे स्वातंत्र्य; डोळ्यांतले स्वप्न अन् स्वप्नपूर्तीही हे स्वातंत्र्य. 
करावया काय आलो अन् काय करवले हाती; चार बंगल्यांच्या जोडीला शेकडो भाकरीच्या खंती.
पासष्ट वर्षांचे स्वातंत्र्य त्याला मतदानाची छत्री; नव्या पहाटेचे स्वप्न, ल्याला देश उत्तररात्री.
कशासाठी स्वातंत्र्य? अन् कसली देता खात्री? प्रगतीचे, निवडीचे स्वातंत्र्य अन् - पोटभर स्वकमाईची विनाखंत खात्री; नव्या स्वप्नांना नवी झालर, होवो समरसतेची छत्री.
- स्वाती, August 15, 2011.