Saturday, June 25, 2011

Words, or Not ...

Words, or Not Words?

 
Me, with a Gun
Oh! Thats so scary!

- - - not to Me

But to Some - - -
Who do things
That are never to be' !!

Oh! Me and my Gun

Words so simple and Basic
Blend into a poem,

Or 'Into a Gun', Say Some,

To spell a disaster
to pretentions, ego & power.

- Swati. Sometime in 2009, found this today while discarding a bag -


'Lost & Found - Gun' ;-))

Saturday, June 11, 2011

अजंठा लेणीपहाडाला चिर मेहनतीची
अपरिग्रहातल्या भव्यतेची


धम्म प्रसाराच्यासाठी
लेणी कोरीव रेखीव
हर एक लेण्यापाठी
बुद्धीप्रामण्याची नीव

शतकानुशतकांची
सुंदर माणसांची चित्रे
आज मात्र इथे कसे
फक्त उरले ससे अन् कुत्रे?

लेणे एक अपुरे
कसे वाटतसे भग्न
छिन्नी - हातोड्याचे अधुरे
राहिले जे स्वप्न


पहाडाची चिर उभी काळाच्या समोर
स्तब्ध बघत जगी भोगवादाचा कहर

- स्वाती जून ५, २०११.
जून १५, २०११.
जून १६, २०११.

सीतेच्या लेकीची रविवार दुपार - १
रविवार दुपार ...

लोकल च्या डब्यात दिसली 
एक भली थोरली अ‍ॅरिस्टोक्रॅट्स बॅग
बाजूला जुनी भांडी - कुंडी 
पोटाशी धरून रडणारी पोर 
 --- आणि खालच्या मानेची तू 


तुझ्या शेजारच्या बाईकडे बघून 
हंबरडा फोडला पोरीने
"पण का म्हणून आपण मावशीच्या घरी जातोय?;
बाबांच्या घरी का नाही रहायचं?"


बाई गं, सार्या डब्याला कळलं 
पोरीच्या बाबांचं होतं घर 
तुम्ही दोघी, घरात असून बेघर
एव्हढ्याशा पोरीला समजलं तर ---

नुसतीच कवटाळून बसलीस तिला 
दुमडून अजून मान
कोरड्या डोळ्यांना लागून तहान
डब्यातल्या सगळ्या डोळ्यांचं सुटलं भान 

एका स्टेशनला उतरायला उठलीस 
अन तुझ्या संसाराचे तुकडे उतरून देता देता
सारा डबा म्हणत होता;
धीराची गं तू,
अंगावरच्या वणांसकट उभी राहिलीस
जप गं, वण काय मिटतील
पण खूप सारं जगावं लागेल - घाव जिरवायला 

उठताना म्हणालीस शेजारच्या मैत्रिणीला,
'पाठवलीये चिठ्ठी हिच्या शाळेला, 
की जातेय दोन आठवडे गावाला'.

मोडलेल्या मनांतला झंकार तसा 
सार्या बायांचा धीर तुझ्यात जसा 

बये कळलं गं,
आज रविवार दुपार ना ---
म्हणून वेळ साधलीस 

आता काही दिवस,
जाशील कामावर बिन-डब्याची
सांगशील धरलाय उपास
पण कामावरून जाशील शोधत आवास

पंधरा दिवसात शोधशील एक मखर

तेही पोरीच्या शाळेजवळ
येईल मगच श्वासात श्वास

पुरे आहे -


एक तू आणि तुझी पोर
बनवाल टेंपरवारी मखर
तुमचं आपलेपणाचं घर.


                                           - स्वाती जून ३ २०११

स्तब्ध

स्तब्ध १

पहिल्या पावसापूर्वी ! . . . . .


पाऊस येऊ येऊ सा
सवयीचं पुस्तक अन
राखाडी आकाश साथीला. 

        - स्वाती जून २ २०११.