Monday, May 23, 2011

Dominating

You push, you pull,
You bully every single soul,
Arrogant speech smells so Foul
Labeling & crushing Bugs - your only Goal!

You suck blood like
Leaches find Humans in the Wild
Your inflated ego
Only to crush every simple mind.

You only like a 'Kill'
Yet you are just a trembling Jill
An unsafe, ungraceful soul
Craving to reach Top of the Hill.

- Swati May 23, 2011

Now I have a feeling, ''Am I sulking?''. :-((

Sunday, May 22, 2011

ओ प्रिया . . .!

गप्प गप्प गाणी ऐकत 
चालताना विना ब्रेक 
तुझी हाक कानी आली,
बस, जरा चहासाठी टेक.

वाटले आहोत झाडाजवळ ---
रंगहीन गर्दीने आली भोवळ 
तुझ्यासाठी डोळ्यांतून ओघळ 
भास - अभासांचा होय गोंधळ, गोंधळ

मागे लागतात कुत्रे 

त्यांची पूर्वीची सवय 
संगे झेलण्याची सय
का ते फक्त वेडे वय?

छत्र्या फिरवत डौलाने 
चालूया परत 
गाणी म्हणूया मोठ्याने 
आपल्याच नादात 

कुठवर आहेस?
कधी येशील परत?

- स्वाती मे २२, २०११.

येऊ घातलेला जेष्ठ

जेष्ठातल्या जेडाने
मन शांत, सोज्वळ - - - !! ??
वसंताच्या जाण्याची
हुरहूर, हळूवार

डोले उशीराचा गुलमोहोर
त्याचा दिलासा जगावर

मन ढगाळ
विचार वंगाळ
वसंतावाचूनचा जेष्ठ
नाही मुळ्ळीच कंगाल

म्हणे,

पुन्हा होईल बरसात
जरी विझू लागली वात
तरी पेटेल सांजवात
रंग उधळत - रोमारोमांत

अस्सा वात्रट हा

येऊ घातलेला जेष्ठ
वसंताच्या मागचा
शांत, सोज्वळ श्रेष्ठ.

- स्वाती मे, २२, २०११.

सारे सारे जे कोणी असा येऊ घातलेला वात्रट जेष्ठ, पडखाऊपणा आणि धीटपणा यांच्या द्वंद्वामधून अनुभवतील, त्या
सार्या सार्यांसाठी, अगदी सप्रेम भेट. ;-))

घर - घोर

घर - घोरगावाकडच्या घरात
हवा मोकळी, दाट मायेत
हवेहवेसे उन, गार गच्च सावलीत

मोगरी, चमेली दरवळतात
बोटभर जुई फुले जास्वंदी जाळीत
चिटूकाचं गाणं करी चहाला सोबत

असे मायेचे हे घर
आज सुकले - कोरडे
सदाफुली जागेवर
रानगवताचे वेढे

पिल्ले गेली दूरवर
माये वाचून घर - दार
असे बेघर - बेघर.

- स्वाती मे २१, २०११


ज्यांनी कोणी असे जीवाला घोर लावणारे घर अनुभवले आहे, त्या सर्वांसाठी ....

Tuesday, May 17, 2011

मन तरंग

मन तरंग

मन दुरंग दुरंग
त्याला अस्तर नवरंग
रंग- बेरंगाचा क्षण
ओढा होई पाषाण

मन अभंग अभंग
करी प्रस्तराला भंग
तपा- तपांचे तापस
एका क्षणात बेरंग

मन दुभंग दुभंग
एका भासामध्ये दंग
उघडे असून मिटले
डोळे कशाने गुंग?

मन सोंग- ढोंग
मुखवट्या वरचा रंग
आणी पाण्यावर तवंग
साचलेला रंग भंग

मन जलतरंग
अर्ध्या वर्तुळाचा संग
साध्या झंकारात
येती सुरांचे सुरुंग

मनातले तरंग आणी
गाण्यामध्ये रंग.

- स्वाती मे १७, २०११.

Sunday, May 8, 2011

आई - - - एक असणं

आई - - - एक असणं

आई - - -
सारे अभिमान गळून पडलेलं 
निव्वळ रूप
कधी साध्या वरण - भाताने
दूरवर लागलेल्या डोळ्यांतून पाणी आणतं

तर कधी
अजून एक घोडचूक केलेल्याला
दारातून घरात घेतं

शांत, आर्त नजरेतलं
शिव्या - शापांच्या पलीकडचं सामर्थ्य, 
"आता ही चूक ओलांडण्याचं काम करणार ना?"
असं आपसूक नतमस्तक करतं

कधी ते
हॉस्पिटलच्या बिछान्यावर
गुपचूप बसून
भरवलेला मऊ - भात खातं

आई  - - - एक असणं
आपल्या - तुपल्यात उमलत असतं.


- स्वाती ८ मे २०११

Wednesday, May 4, 2011

Crossover

Crossover

Crossover the fence
Enter the Zone, beyond  - - - Known
Investigate the Non-Sense to make sense

You are Bestowed, Oh my friend.


Swati, May 04, 2011