Posts

Showing posts from April, 2011

A Haiku on Me

A Haiku on Me!


Comfortable in the fast paced vehicle
I look amused in the Journey of Life


- Swati April 30, 2011

गोळा

गोळा
गोळे सरबत वाल्याकडे गेले,  त्याला म्हणाले, "एक गोळा द्या, नारिंगी - नारिंगी रंगाचा "
तो बघतच उभा राहिला , म्हणाला, ''Madam गोळा हवा की सरबत?" त्याला म्हंटलं अरे, "गोळा, गोळाच हवा आहे - तो पण अगदी नारिंगी, नारिंगी रंगाचाच"
पैसे दिले, गोळा मिळाला; ग्लासातल्या चमचमत्या नारिंगी गोळ्या कडे बघताच  विरघळत गेली मधली पंचावन्न वर्षे .......
एक जागा पकडली आणि बसले  गोळ्याच्या पहिल्या चोखीमध्ये  बनून गेले एक परकरी पोर  --------  शाळेतली !
हाता तोंडाने माखून माखून गोळा खाणारी आणि ; गोळ्यातला गोळा बनून जाणारी .
विरघळून जाणे - - - - गोळ्यातला गोळा होणे ..... छे, आता असं होत नाही.
अजूनही होते मी कधीतरी शाळकरी पोर  पण तरीही मी, मीच असते, चमचमत्या नारिंगी गोळ्याबरोबर जगण्याचा सोहळा करणारी.
- स्वाती एप्रिल २९, २०११ 

जिवाचे बोल

जिवाचे बोल

कधी कधी जीव दमून जातो चष्मा सुद्धा डोळ्या वरती जड जड होतो चष्मा लावून बघणे हा मोठ्ठा ताण बनतो 
दोन - चार वेळा दीर्घ श्वास घ्यावा असा मोह होतो 
अंधारात लपलेल्या फुलांचा वास नाकात भरावा; संध्याकाळचा वारा हलकेच अंगावर यावा; असा विसावा हवासा वाटतो 
कधी कधी जीव दमून जातो.
- स्वाती,  एप्रिल १८, 7.50 pm  

वसंतातल्या छोटुकल्या कविता

Image
वसंतातल्या छोटुकल्या कविता

1.
हिरव्या पानांचा, पिवळ्या फुलांचा, तांबड्या तुर्यांचा,
आला वसंत
उमलत, उलगत, फुलवत - - -
आणि संगे सयींचे आवर्त.

2.
मेंदी ल्याले केस
त्यांना निलगिरीचा सुगावा
रणरणत्या डोक्यातून
दिलखुश गारवा.

- स्वाती April 3, 2011मरीन ड्राईव्ह

मरीन ड्राईव्ह

विशीतला मरीन ड्राईव्ह
ऐन दुपारी चांदण्याची बरसात असतो
त्यात 'तू' बरोबर असशील तर - - -
मग कोजागिरीच जणू .

तिशीतला मरीन ड्राईव्ह
कामाच्या जोशात
हा हा म्हणता संपून जातो.

चाळीशीत जाणवतात मरीन ड्राईव्ह  वरती उन्हाचे चटके,  घामाचा चिकचिकाट आणि विसावण्याची गरज.

- स्वाती एप्रिल ६, २०११