Posts

Showing posts from 2011

फरक

फरक

रोज सकाळी  उघड्या अंगाचा उठून अंघोळ दाढी करून अन् भांग पाडून  गळा बंद शर्ट आणि कडक इस्त्री विजार, असा तो बाहेर पडतो 
जशी बेदरकार वासना  कोंडलीये पिंजर्यामध्ये - - -
रोज सकाळी  विस्कटलेल्या केसा-चेहर्याची उठून  अंघोळ वेणी - फणी करून अन् अत्तर फवारून ती लपेटते तिची स्वच्छ, नरम, झुळझुळीत वस्त्रे,
जशी व्यक्त व्हावी अधूरी कामना तरल नाजूकतेची शृंगारामध्ये - - -

- स्वाती October 20, 2011. 

मोह : -)

मोह

हिरव्या उघड्या देहावरी
इन्द्रधनुची तिरीप |
रंग - ढंगांची फुलोरी
तुझी राकट झडप ||

वारा आवरेना वावरी
काय छंदी - फंदी रीत |
हिरव्या देहात उभार
हाय, संयमाशी फारकत ||

जाग अलगद आली
संथ मिठी सैलावत |
हिरव्या देहांवर दवली
घर्मबिंदू कलाबूत ||


- स्वाती, September 24, 2011.

स्तब्ध - २

स्तब्ध - २


चिंब भिजली फुले, गवतावरचे मोती शब्दांची वाफ झुले अवती - भवती.

           - स्वाती August 28, 2011.

स्वातंत्र्याची उत्तररात्र ....

स्वातंत्र्याची उत्तररात्र ....
चिंब भिजून आले स्वातंत्र्य मध्यरात्री; फाळणीचे घाव बसले डाव्या - उजव्या गात्री.
जोश, अन् आनंद अन् खंतही हे स्वातंत्र्य; डोळ्यांतले स्वप्न अन् स्वप्नपूर्तीही हे स्वातंत्र्य. 
करावया काय आलो अन् काय करवले हाती; चार बंगल्यांच्या जोडीला शेकडो भाकरीच्या खंती.
पासष्ट वर्षांचे स्वातंत्र्य त्याला मतदानाची छत्री; नव्या पहाटेचे स्वप्न, ल्याला देश उत्तररात्री.
कशासाठी स्वातंत्र्य? अन् कसली देता खात्री? प्रगतीचे, निवडीचे स्वातंत्र्य अन् - पोटभर स्वकमाईची विनाखंत खात्री; नव्या स्वप्नांना नवी झालर, होवो समरसतेची छत्री.
- स्वाती, August 15, 2011.

सीतेच्या लेकीची रविवार दुपार - २

सीतेच्या लेकीची रविवार दुपार- भाग २ 
परवा होता माझ्या बाळीचा वाढदिवस  आठ वर्षांची झाली एव्हढीशी होती  डोळे मिटून जांभया देणारी माझी बाळी.
ही झाल्यापासून कसं सगळं बदललं  सगळे आनंद हिच्या एका मिठीत  हिच्या एका नजरेपायी कुठवर आलेय _ _ _ 
दोन वर्षांपूर्वी हिच्या वाढदिवसाला ही मोठ्ठी पार्टी दिली होती त्याने, 'पुरणपोळ्या आणि बटाटे वडे कर', म्हणाला स्वयंपाकात थकलेल्या माझ्या चेहर्याला वैतागून दिलेला मार तर होताच जणू पाचवीला पूजलेला...
पार्टी आधी सुजलेल्या चेहर्यावर रंग थापताना  बघितला तुझा भेदरलेला चेहरा.
तेव्हाच ठरवले, बास झाले! 'हिला आई बरोबर बाप पण रोज मिळायसाठी मारून टाकायचे नाही स्वत:ला, _ _ _ आणि तिच्यातल्या बाळीला!'.
म्हणून तर आज इथवर आलेय.
सांगितलं परवा दिवशी तिला जेव्हा,  की, 'बाप' राहील तो जन्मभर तुझा  पण 'नवरा' नाही राहिला तो आता माझा; मारलाय शिक्का कोर्टाने - की झालाय काडी-मोड आमच्या नात्याचा. दर महिन्याला तुझ्या चोकलेट - खेळण्यासाठी पैसे देणारेय म्हणाला _ _ _
इथ पर्यंत शांत ऐकणारी तू  एकदम म्हणालीस,  'नकोत गं ते पैसे आई,   मला चोकलेट मिळायच्या आधी…

Words, or Not ...

Words, or Not Words?
Me, with a Gun
Oh! Thats so scary!

- - - not to Me
But to Some - - -
Who do things
That are never to be' !!

Oh! Me and my Gun
Words so simple and Basic
Blend into a poem,

Or 'Into a Gun', Say Some,
To spell a disaster
to pretentions, ego & power.

- Swati. Sometime in 2009, found this today while discarding a bag -

'Lost & Found - Gun' ;-))

अजंठा लेणी

Image
पहाडाला चिर मेहनतीची
अपरिग्रहातल्या भव्यतेची


धम्म प्रसाराच्यासाठी
लेणी कोरीव रेखीव
हर एक लेण्यापाठी
बुद्धीप्रामण्याची नीव

शतकानुशतकांची
सुंदर माणसांची चित्रे
आज मात्र इथे कसे
फक्त उरले ससे अन् कुत्रे?

लेणे एक अपुरे
कसे वाटतसे भग्न
छिन्नी - हातोड्याचे अधुरे
राहिले जे स्वप्न


पहाडाची चिर उभी काळाच्या समोर
स्तब्ध बघत जगी भोगवादाचा कहर
- स्वाती जून ५, २०११. जून १५, २०११. जून १६, २०११.

सीतेच्या लेकीची रविवार दुपार - १

रविवार दुपार ...

लोकल च्या डब्यात दिसली  एक भली थोरली अ‍ॅरिस्टोक्रॅट्स बॅग
बाजूला जुनी भांडी - कुंडी  पोटाशी धरून रडणारी पोर   --- आणि खालच्या मानेची तू 

तुझ्या शेजारच्या बाईकडे बघून  हंबरडा फोडला पोरीने "पण का म्हणून आपण मावशीच्या घरी जातोय?; बाबांच्या घरी का नाही रहायचं?"

बाई गं, सार्या डब्याला कळलं  पोरीच्या बाबांचं होतं घर  तुम्ही दोघी, घरात असून बेघर एव्हढ्याशा पोरीला समजलं तर ---
नुसतीच कवटाळून बसलीस तिला  दुमडून अजून मान कोरड्या डोळ्यांना लागून तहान डब्यातल्या सगळ्या डोळ्यांचं सुटलं भान 
एका स्टेशनला उतरायला उठलीस  अन तुझ्या संसाराचे तुकडे उतरून देता देता सारा डबा म्हणत होता; धीराची गं तू, अंगावरच्या वणांसकट उभी राहिलीस जप गं, वण काय मिटतील पण खूप सारं जगावं लागेल - घाव जिरवायला 
उठताना म्हणालीस शेजारच्या मैत्रिणीला, 'पाठवलीये चिठ्ठी हिच्या शाळेला,  की जातेय दोन आठवडे गावाला'.
मोडलेल्या मनांतला झंकार तसा  सार्या बायांचा धीर तुझ्यात जसा 
बये कळलं गं, आज रविवार दुपार ना --- म्हणून वेळ साधलीस 
आता काही दिवस,
जाशील कामावर बिन-डब्याची
सांगशील धरलाय उपास
पण कामावरून जाशील शोधत आवास

प…

स्तब्ध

स्तब्ध १
पहिल्या पावसापूर्वी ! . . . . .

पाऊस येऊ येऊ सा सवयीचं पुस्तक अन राखाडी आकाश साथीला. 
        - स्वाती जून २ २०११.

Dominating

You push, you pull, You bully every single soul, Arrogant speech smells so Foul Labeling & crushing Bugs - your only Goal!
You suck blood like
Leaches find Humans in the Wild
Your inflated ego
Only to crush every simple mind.
You only like a 'Kill'
Yet you are just a trembling Jill
An unsafe, ungraceful soul
Craving to reach Top of the Hill.
- Swati May 23, 2011
Now I have a feeling, ''Am I sulking?''. :-((

ओ प्रिया . . .!

गप्प गप्प गाणी ऐकत  चालताना विना ब्रेक  तुझी हाक कानी आली, बस, जरा चहासाठी टेक.
वाटले आहोत झाडाजवळ --- रंगहीन गर्दीने आली भोवळ  तुझ्यासाठी डोळ्यांतून ओघळ  भास - अभासांचा होय गोंधळ, गोंधळ
मागे लागतात कुत्रे 
त्यांची पूर्वीची सवय 
संगे झेलण्याची सय
का ते फक्त वेडे वय?

छत्र्या फिरवत डौलाने 
चालूया परत 
गाणी म्हणूया मोठ्याने 
आपल्याच नादात 

कुठवर आहेस?
कधी येशील परत?

- स्वाती मे २२, २०११.

येऊ घातलेला जेष्ठ

जेष्ठातल्या उजेडाने मन शांत, सोज्वळ - - - !! ??
वसंताच्या जाण्याची
हुरहूर, हळूवार

डोले उशीराचा गुलमोहोर
त्याचा दिलासा जगावर

मन ढगाळ
विचार वंगाळ
वसंतावाचूनचा जेष्ठ
नाही मुळ्ळीच कंगाल

म्हणे,

पुन्हा होईल बरसात
जरी विझू लागली वात
तरी पेटेल सांजवात
रंग उधळत - रोमारोमांत

अस्सा वात्रट हा
येऊ घातलेला जेष्ठ
वसंताच्या मागचा
शांत, सोज्वळ श्रेष्ठ.

- स्वाती मे, २२, २०११.
सारे सारे जे कोणी असा येऊ घातलेला वात्रट जेष्ठ, पडखाऊपणा आणि धीटपणा यांच्या द्वंद्वामधून अनुभवतील, त्या सार्या सार्यांसाठी, अगदी सप्रेम भेट. ;-))

घर - घोर

घर - घोर


गावाकडच्या घरात
हवा मोकळी, दाट मायेत
हवेहवेसे उन, गार गच्च सावलीत

मोगरी, चमेली दरवळतात
बोटभर जुई फुले जास्वंदी जाळीत
चिटूकाचं गाणं करी चहाला सोबत

असे मायेचे हे घर
आज सुकले - कोरडे
सदाफुली जागेवर
रानगवताचे वेढे

पिल्ले गेली दूरवर
माये वाचून घर - दार
असे बेघर - बेघर.

- स्वाती मे २१, २०११

ज्यांनी कोणी असे जीवाला घोर लावणारे घर अनुभवले आहे, त्या सर्वांसाठी ....

मन तरंग

मन तरंग

मन दुरंग दुरंग
त्याला अस्तर नवरंग
रंग- बेरंगाचा क्षण
ओढा होई पाषाण
मन अभंग अभंग
करी प्रस्तराला भंग
तपा- तपांचे तापस
एका क्षणात बेरंग
मन दुभंग दुभंग
एका भासामध्ये दंग
उघडे असून मिटले
डोळे कशाने गुंग?
मन सोंग- ढोंग
मुखवट्या वरचा रंग
आणी पाण्यावर तवंग
साचलेला रंग भंग
मन जलतरंग
अर्ध्या वर्तुळाचा संग
साध्या झंकारात
येती सुरांचे सुरुंग
मनातले तरंग आणी
गाण्यामध्ये रंग.
- स्वाती मे १७, २०११.

आई - - - एक असणं

आई - - - एक असणं

आई - - - सारे अभिमान गळून पडलेलं  निव्वळ रूप कधी साध्या वरण - भाताने दूरवर लागलेल्या डोळ्यांतून पाणी आणतं
तर कधी अजून एक घोडचूक केलेल्याला दारातून घरात घेतं
शांत, आर्त नजरेतलं शिव्या - शापांच्या पलीकडचं सामर्थ्य,  "आता ही चूक ओलांडण्याचं काम करणार ना?" असं आपसूक नतमस्तक करतं
कधी ते हॉस्पिटलच्या बिछान्यावर गुपचूप बसून भरवलेला मऊ - भात खातं
आई  - - - एक असणं आपल्या - तुपल्यात उमलत असतं.

- स्वाती ८ मे २०११

Crossover

Crossover
Crossover the fence Enter the Zone, beyond  - - - Known Investigate the Non-Sense to make sense
You are Bestowed, Oh my friend.

Swati, May 04, 2011


A Haiku on Me

A Haiku on Me!


Comfortable in the fast paced vehicle
I look amused in the Journey of Life


- Swati April 30, 2011

गोळा

गोळा
गोळे सरबत वाल्याकडे गेले,  त्याला म्हणाले, "एक गोळा द्या, नारिंगी - नारिंगी रंगाचा "
तो बघतच उभा राहिला , म्हणाला, ''Madam गोळा हवा की सरबत?" त्याला म्हंटलं अरे, "गोळा, गोळाच हवा आहे - तो पण अगदी नारिंगी, नारिंगी रंगाचाच"
पैसे दिले, गोळा मिळाला; ग्लासातल्या चमचमत्या नारिंगी गोळ्या कडे बघताच  विरघळत गेली मधली पंचावन्न वर्षे .......
एक जागा पकडली आणि बसले  गोळ्याच्या पहिल्या चोखीमध्ये  बनून गेले एक परकरी पोर  --------  शाळेतली !
हाता तोंडाने माखून माखून गोळा खाणारी आणि ; गोळ्यातला गोळा बनून जाणारी .
विरघळून जाणे - - - - गोळ्यातला गोळा होणे ..... छे, आता असं होत नाही.
अजूनही होते मी कधीतरी शाळकरी पोर  पण तरीही मी, मीच असते, चमचमत्या नारिंगी गोळ्याबरोबर जगण्याचा सोहळा करणारी.
- स्वाती एप्रिल २९, २०११ 

जिवाचे बोल

जिवाचे बोल

कधी कधी जीव दमून जातो चष्मा सुद्धा डोळ्या वरती जड जड होतो चष्मा लावून बघणे हा मोठ्ठा ताण बनतो 
दोन - चार वेळा दीर्घ श्वास घ्यावा असा मोह होतो 
अंधारात लपलेल्या फुलांचा वास नाकात भरावा; संध्याकाळचा वारा हलकेच अंगावर यावा; असा विसावा हवासा वाटतो 
कधी कधी जीव दमून जातो.
- स्वाती,  एप्रिल १८, 7.50 pm  

वसंतातल्या छोटुकल्या कविता

Image
वसंतातल्या छोटुकल्या कविता

1.
हिरव्या पानांचा, पिवळ्या फुलांचा, तांबड्या तुर्यांचा,
आला वसंत
उमलत, उलगत, फुलवत - - -
आणि संगे सयींचे आवर्त.

2.
मेंदी ल्याले केस
त्यांना निलगिरीचा सुगावा
रणरणत्या डोक्यातून
दिलखुश गारवा.

- स्वाती April 3, 2011मरीन ड्राईव्ह

मरीन ड्राईव्ह

विशीतला मरीन ड्राईव्ह
ऐन दुपारी चांदण्याची बरसात असतो
त्यात 'तू' बरोबर असशील तर - - -
मग कोजागिरीच जणू .

तिशीतला मरीन ड्राईव्ह
कामाच्या जोशात
हा हा म्हणता संपून जातो.

चाळीशीत जाणवतात मरीन ड्राईव्ह  वरती उन्हाचे चटके,  घामाचा चिकचिकाट आणि विसावण्याची गरज.

- स्वाती एप्रिल ६, २०११

पुस्तकात काय असावं ....?

पुस्तकात काय असावं ....?
पुस्तकात ज्ञानाच्या बरोबरीने असावं .... चित्र जगण्याचं , ज्यात असतात रंग - - -  सुखं उधळणारे, आणि  दु:खांना सावरणारे. 
असावं पुस्तकात  एक सुवासिक फूलही  ज्ञान यात्रेला सोबत  नम्र, सुगंधी लाट पसरवणारं  शांत, समंजस साथीचा भरोसा देणांर .
आणि तसंच असावं पुस्तकांत सार्यांच्या कडू - गोड आठवणीचं कपाट ज्याने अर्धवट ज्ञान आणि गर्व होईल सपाट .
काय कराव पुस्तकानं ? ज्ञान द्यावं , - - - खडबडून जाग आणणारं , उद्वेग शांतवणारं, आणि अन्याय थोपवणारं तुझ्या दु:खात माझे सुख नसतं - हे ठणकावणारं .
पुस्तकाला सलाम, ज्ञानाला सलाम  रंग, वास, ज्ञान आणि सयींची कास सोडणारे सारे सारे गुलाम !!!
- स्वाती २६, मार्च,2011.
सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान कधीतरी आणि ही कविता college मध्ये ऐन सेमिनार च्या कामाची घाई असताना आली. My dear Shruti, या कविते साठी तुला धन्यवाद. काल सकाळी college मध्ये पोचल्यावर माझ्या काम करायला घेतलेल्या वहीवर तू एक ओळ लिहिलीस , " पुस्तकात ज्ञानाच्या बरोबरीने असावं ...." आणि म्हणालीस , चल, आता याच्यावर पुढे लिही, तू आणि मी कसा विचार करतो ते बघुयाच !

यावर तिच्या कडे माझे कामाचे tension क…

Words Like Freedom

Words Like Freedom!

There are words like, 'Freedom'
Which don't even exist
For some Among us.

There are Worlds of 'Freedom'
Which do exist
For a few of us!

We have freedom ...
To Wait and Watch ...
Ohh, really??

- Swati, March 20, 2011

Bubbles!

Bubbles!


Avoiding to admit the Void,
We rain words &; smiles
As a Disguise;
Like Bubbles - Colourful, Sizeable and Empty.
Hollowness restores
At an Unintentional Little Prick!


- Swati.
March 12, 2011.

स्त्री - पुरुष

स्त्री - पुरुष 
नाते युगायुगांचे  एकमेकांसाठींच्या साच्यात  चपखल बसणारे, सलगीने डोलताना अचानक अलगपणा आणणारे .
नाते तुझे नी माझे  नाते युगायुगांचे 
बांधा वरच्या निंबा सारखे  पाळे - मुळे शेतात असून  शेताबाहेर पोचणारे, नाते तुझे नी माझे.
नाते - - -  जसे मुळांचे आणि पालवीचे  मुळांतल्या ओलाव्याने  पालवीच्या बहराचे  आणि पालवीच्या श्वासावर  मुळांच्या वाटचालीचे 
कोण वर आणि कोण खाली?  कोण पुढे आणि कोण मागे?
XX आणि XY, इतकं सारे भांडून मिळवलेत काय?
- स्वाती March 02, 2011

होईलसं बरंच काही

होईलसं बरंच काही 
हे आहे - - - हे जसं आहे,  तसंच आहे.
माहिती आहे  इथे खूप दलदल आहे  चिखल गाळाने साचलेले तळे आहे 
पण तरीही - - -
इथे कमळे फुलवता येतील अशी आशा देखील आहे !
हे आहे , असंच आहे 
- - - आशेपायी आणि ऊर्मीपायी  बरंच काही, हवं तसं, होईलसं आहे ! !
- स्वाती  February 27, 2011. कुसुमाग्रज दिन अथवा मराठी भाषा दिन

ऋण

Image
ऋण
अनंत काही क्षणापूर्वी   खूप काही हरवले, गवसले आणि कमावलेही.
सारं काही मागे टाकल्या वर सुद्धा  उरलातच तुम्ही 
खोलवर सोडलेल्या हर एक नि:श्वासातल्या   आणि आसवांतल्या  हमसफर आणि साथीदार 


चमेली, मोगरा, जास्वंदी ---  तारेवरचा खंड्या आणि मोहोळातल्या मध माशांनो ,
तुमचा एक  एक  श्वास    सुवास आणि आवाज  - - - जीवनाचे दान - - - नाही जगण्याचे कारण होता 
पडझडलेल्या  आयुष्याला  सावरणारे बळ होता
सख्यांनो तुमचेच जीवन    तुमच्यातच दंगते मन.
- स्वाती  February, 10, 2011

The World of Agony

The World of Agony


Pretending to be Good ....
Has a good reason to be,
.... to achieve things Not So Good.


Domination in disguise of Politeness
Affects me not - now;
But the poor anticipation of it does!


Madness about Methods and
Madness being a Method,
All symbolic gestures of hypocrisy,
And pretensions of wisdom,
---- All bare in the open.


Our shameless choice,
.... of Thoughtless Resilience!
Or the lack of Spine?


Hey All,
I choose to laugh at Thee ... And Me.


Our compartments of
vanity, charity &; sanity
Make the World of Agony.


- Swati.
Feb. 5, 2011.
(I have been feeling this for past few months, but no words. In the disturbing process of feeling, the coming of words was the real sunshine.) :-)

Admirer

Admirer
Oh! What a wonderful day ... I saw you today
Your Introspective Looks, While sailing as a Cloud, Gazing at the grass, birds & trees ... Beyond the noisy city street,
And how effortlessly you smile!
Oh dear, Keep up your Sunshine Smile !!!
- Swati January 24, 2011