Wednesday, August 11, 2010

क्षितीज ओलांडताना


क्षितीज ओलांडताना

एक चौकट निवडायची
त्यात   मावेलसा कागद अडकवायचा
मग त्यावर चितारायचे - - - -

ही कसली उफराटी रीत तुझी?

जगावेगळे करण्याचा तुझा विश्वास ?
- की ठरवलेल्या मर्यादेत 
काहीतरी  - - - करत राहण्याचा अट्टाहास ?

ओ   प्रिया, 
पावसात चिंब भिजत रस्त्याने जाताना 
अखंड गाणी गाणारे आपण
आता छत्री असून 
वळचणीला गप्पगार उभे राहतोय !
हे काय झालं ? 

चल तर मग समुद्रावर - - -
गरम वाळूत, उन पावसाच्या गारव्यात 
भरून घेऊया  -
सारे रंग 
क्षितीजाच्या अंतापर्यन्तचे  - आणि पलिकडचे!

               - स्वाती August 11, 2010.